Pimpri News : पंधरा दिवसात विना मास्क फिरणाऱ्या 316 जणांवर कारवाई, 1.58 लाखाचा दंड वसूल

0

एमपीसी न्यूज – या महिन्यात 1 ते 15 सप्टेंबर या पंधरा दिवसात विना मास्क फिरणाऱ्या 316 जणांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईतून 1 लाख 58 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर पडल्यावर प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 316 नागरिकांवर कारवाई करून 1 लाख 58 हजार इतक्या रकमेचा दंड वसूल केला.कोरोनाची खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना फेस मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.