Pimpri News : घरगुती वीजदरातील वाढ तत्काळ मागे घ्यावी – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (Pimpri News) सरकारने आज पासून घरगुती वीजदरात 6 टक्यांनी वाढ केल्याचा आरोप करत ही दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भापकर यांनी म्हटले आहे की, टोल व एलपीजी सिलेंडर महाग होणार आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या तीन लॉकडाऊनमुळे उद्योजक,लघुउद्योजक, लहान-मोठे व्यापारी, सामान्य नागरिक यांच्यावर विपरीत परिणाम झाले आहेत. त्यातून सामान्य माणसाच्या हातून रोजगार गेला आहे. प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. तसेच यापूर्वी वारंवार पेट्रोल डिझेल गॅसचे प्रचंड दर वाढले आहेत. यामुळे महिलांचे किचन बजेट ढासळले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी, कामगार,उद्योजक,लघुउद्योजक, छोटे-मोठे व्यापारी व सामान्य नागरिक बेरोजगारी आणि महागाईमुळे मेटाकोटीला आलेला आहे.

Nigdi : चोरीची वाहने स्क्रॅप करणारे भंगार व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

अशा परिस्थितीमध्ये वीजदरात 6 टक्के दरवाढ व टोल, एलपीजी सिलेंडर दरवाढ ही सामान्य माणसाची कंबरडे मोडणारी ठरणार आहे. त्यामुळे या ईडी सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. ही सर्व दरवाढ ईडी सरकारने तात्काळ मागे घ्यावी. अन्यथा (Pimpri News) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सामान्य जनता, कामगार शेतकरी उद्योजक लघुउद्योजक लहान-मोठे व्यापारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा रस्ता दाखवल्या शिवाय स्वस्त बसणार नाहीत. सरकारने याची गंभीरपणे नोंद घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.