Pimpri news: ‘वायसीएमएच’मध्ये प्लाझ्मा मशीन वाढवा; महापौरांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात यशस्वी उपचार घेऊन कोरोनाचे अनेक रुग्ण बरे होत आहेत. या उपचारात प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरत आहे. परंतु, ‘वायसीएमएच’मध्ये एकच प्लाझ्मा मशीन असल्याने दाते, नातेवाईकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्लाझ्मा मशीनची संख्या वाढविण्याची सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग, प्रादुर्भाव, रुग्णांचे वाढते मृत्यू रोखण्यासाठी पालिका शर्तीचे प्रयत्न करत आहे. कोरोना संकटाचा सामना अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांवर पालिकेच्या रुग्णालयात यशस्वी उपचार केले जात आहेत. 50 हजारहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

या उपचारात प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत आहे. परंतु, ‘वायसीएमएच’मध्ये एकच प्लाझ्मा मशीन असल्याने दाते, नातेवाईकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पालिकेच्या रुग्णांलयामध्ये प्लाझ्मा जमा करणाऱ्या अधिक मशीनची आवश्यकता आहे. याबाबत शहनिशा करून त्वरित प्लाझ्मा मशीनची संख्या वाढविण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी सूचना महापौर ढोरे यांनी आयुक्तांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.