_MPC_DIR_MPU_III

Pimpri news: कोविड केअर सेंटर परिसरात पोलिसांची गस्त वाढवा- भाजप महिला मोर्चाची मागणी

कोविड सेंटरमधील महिला असुरक्षित असल्याचा आरोप करत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवारी) राज्यात आंदोलन केले.

एमपीसी न्यूज – कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोविड सेंटरमधील महिला सुरक्षित असल्या पाहिजेत. त्यासाठी तेथे महिला सुरक्षारक्षक असाव्यात. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशा मागण्या भाजप महिला मोर्चाने पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

कोविड सेंटरमधील महिला असुरक्षित असल्याचा आरोप करत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवारी) राज्यात आंदोलन केले. यामध्ये पोलीस यंत्रणा तसेच प्रशासन व जिथे नगरपालिका, महानगरपालिका असेल तिथे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, उमा खापरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले. यावेळी प्रदेश पदाधिकारी शैला मोळक, शहराच्या अध्यक्षा उज्वला गावडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारती विनोदे, कोमल काळभोर, जिल्हा सरचिटणीस दिपाली धनोकार, सुप्रिया पाटील आदी उपस्थित होत्या.

_MPC_DIR_MPU_II

उमा खापरे म्हणाल्या, कोविड सेंटरमधील महिला सुरक्षित असल्या पाहिजेत. तिथे महिला सुरक्षारक्षक असल्या पाहिजेत. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असावी. पोलिसांकडे पीपीई किट पाहिजे. कदाचित काही घटना घडली तर पोलिस यंत्रणा तिथे ताबडतोब पोहोचली पाहिजे. ज्या रूममध्ये महिला ऍडमिट आहे तिथे बेलची व्यवस्था असावी तसेच पोलीस यंत्रणा आणि महापालिक अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असावा.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ताबडतोब या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यांनी  पोलीस यंत्रणेला  सूचना केल्या. पालिका आयुक्तांना फोन केला आणि ताबडतोब समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.

निश्चितच या राज्यव्यापी आंदोलनामुळे  कोविड  सेंटरमधील महिलांना सुरक्षा उपलब्ध होईल अशी आशा आहे, असे खापरे म्हणाल्या.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.