Pimpri News: ‘रावेत बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता वाढवा’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

वाघोली पाणीपुरवठा योजना महापालिकेला हस्तांतरित करण्याबाबत कार्यवाही करा

एमपीसी न्यूज – रावेत बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी या बंधाऱ्याची उंची वाढवविण्यात यावी; अथवा नवीन बांधकामाबाबत नियोजन करावे. वाघोली पाणीपुरवठा योजनेचा लाभ पिंपरी-चिंचवड शहराला मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही गतीने करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

दरम्यान, वाघोली पाणीपुरवठा योजना पिंपरी महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय पुणे महापालिकेवर अवंलबून आहे. प्रतिदिन तीस दशलक्ष लीटर क्षमतेची वाघोली पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस हस्तांतरण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक झाली.

बैठकीला आमदार सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.

यावेळी वाघोली पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत तसेच रावेत बंधाऱ्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. रावेत बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी या बंधाऱ्याची उंची वाढवण्याबाबत अथवा नवीन बांधकामाबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.