Pimpri News: इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे काम रखडले ! ; 15 महिन्यात केवळ 15 टक्के काम

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील लोहमार्गावरील इंदिरा गांधी उड्डाणपुल दुरूस्तीचे काम संथ गतीने सुरू आहे. खासगी सल्लागार यांच्या दुर्लक्षामुळे ते काम गेल्या 15 महिन्यात केवळ 15 टक्के इतके झाले आहे. परिणामी, काम रखडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. असे असूनही महापालिकेने सल्लागार व ठेकेदारांवर कारवाई केलेली नाही.

इंदिरा गांधी उड्डाणपुल धोकादायक झाल्याने त्यांची स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले. त्यानुसार त्याचे दुरूस्ती काम पालिकेने हाती घेतले. दुरूस्ती काम हरक्युलेस स्ट्रक्‍चरल सिस्टिम करीत आहेत.

या कामासाठी सल्लागार म्हणून सीव्ही कांड यांची नियुक्ती करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे मनुष्यबळाअभावी पुलाचे काम रखडले आहे. गेल्या 15 महिन्यात केवळ 15 टक्के काम ठेकेदाराला करता आले आहे.

काम जमत नसल्याने सल्लागार म्हणून सीव्ही कांड यांच्याशी महापालिकेने करार रद्द केला आहे. त्यांच्या जागी युनिसन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंन्स्ट्रक्शनच्या नियुक्तीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उर्वरित कामे नवीन एजन्सी करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.