Pimpri : इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या फलकाचे अनावरण

एमपीसी न्यूज – इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या नामफलकाचे अनावरण डिस्ट्रिक्ट चेअरमन रेणू गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. हा नामफलक अनावरणाचा कार्यक्रम पिंपरी मधील मोरवाडी चौकात आज (सोमवारी) झाला.

नामफलक अनावरणाच्या कार्यक्रमासाठी पीडीसी मंजू शर्मा, इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा मनीषा समर्थ, सचिव अनिंदिता मुखर्जी, वैशाली शहा, संगीता देशपांडे, सुनीता कुलकर्णी, हंसा मोहन, बेला अगरवाल, अनुराधा सूद, विनिता अरोरा आदी उपस्थित होत्या.

_MPC_DIR_MPU_II

डिस्ट्रिक्ट चेअरमन रेणू गुप्ता म्हणाल्या, “पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये एकूण 65 इनर व्हील क्लब आहेत. यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जात आहे. पुढील काळात सर्व क्लब मिळून एक गाव दत्तक घेणार असून गावाचा पूर्णतः कायापालट करून त्या गावाला आधुनिक गाव म्हणून नावलौकिक मिळवून देणार आहोत. यामुळे ग्रामीण संस्कृतीसह अन्य घटक संपूर्ण समाजात पसरतील. विद्यार्थी गळती हा इनरव्हील क्लबचा एक मुख्य उद्देश आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावलेली स्थिती सुधारण्यासाठी इनर व्हील क्लबच्या माध्यमातून त्या शाळांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना हॅपी स्कूलमध्ये बदण्यात येत आहे. इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या नामफलकामुळे क्लबची ख्याती पिंपरी परिसरात आणखी बळकटीने पसरणार आहे.”

अध्यक्षा मनीषा समर्थ म्हणाल्या, “इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी हे एक महिलांचे संगठन आहे. या क्लबच्या माध्यमातून महिला सामाजिक कार्य करतात. इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हा नामफलक लावण्यात आला आहे. यामुळे समाजातील विविध स्तरातील वंचित घटक आणि दानशूर व्यक्ती क्लब पर्यंत पोहोचू शकतील. त्यांच्या माध्यमातून क्लबचा हा महामेरू वृद्धिंगत होईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.