Pimpri News: मोरवाडीत आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमाचे नूतनीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक टुल्स किट, इक्विपमेंट, मशिनरी आदी साहित्य खरेदी करण्याकरिता साडेपाच कोटी रुपये खर्च होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1992 मध्ये मोरवाडी आयटीआयची स्थापना केली. ज्यावेळी आयटीआय सुरू झाले तेव्हा 3 ते 4 ट्रेड शिकविण्यात येत. त्यावेळी आस्थापना खर्च, कच्चा माल, साहित्य खर्च कमी होता. तथापि, मोरवाडी आयटीआयमध्ये आजमितीला 14 ट्रेड शिकविले जात आहेत. 14 ट्रेडच्या 36 तुकड्यांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आयटीआयमधील वीजतंत्री (इलेक्ट्रॉनिक्स) या अभ्यासक्रमाचे नूतनीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.

त्यासाठी आवश्यक टुल्स किट, इक्विपमेंट, मशिनरी आदी साहित्य खरेदी करून टर्न की प्रोजेक्ट कार्यान्वित करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. 6 कोटी 42 लाख रुपये निविदा दर निश्चित केला. या निविदा प्रक्रियेत नवी सांगवीतील इंद्रनील टेक्नॉलॉजीस यांनी निविदादरापेक्षा 14.12 टक्के कमी म्हणजेच 5 कोटी 52 लाख रुपये दर सादर केला. हा दर लघुत्तम असल्याने स्वीकृत केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.