Pimpri News : जेईई, नीट परीक्षार्थींसाठी भाजप युवा मोर्चाची हेल्पलाईन

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीही अडचण, समस्या असल्यास त्यांनी हेल्पलाईन क्रमांक 7277097999 या व्हाट्सॲपवर कळवावे.

एमपीसी न्यूज – जेईई आणि नीट परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीही अडचण, समस्या असल्यास त्यांनी हेल्पलाईन क्रमांक 7277097999 या व्हाट्सॲपवर कळवावे. त्यांच्यासाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते मदतीला तत्पर असतील, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.

हेल्पलाईन उपक्रमाबद्दल माहिती देताना विक्रांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या संख्येने जेईई आणि नीट परीक्षार्थी आहेत. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्याच्या अनुषंगाने मदतीची गरज भासू शकते.

त्यासाठी विद्यार्थ्यांना आपले नाव, आपल्या जिल्ह्याचे नाव तसेच कोणत्या स्वरूपची समस्या आहे, याविषयी संक्षिप्त माहिती 7277097999 या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवायची आहे.

गरजू विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सहायता करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती विक्रांत पाटील यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्वरूपाची अडचण आल्यास हक्काने संपर्क करावा, युवा मोर्चाचे कार्यकर्ते मदतीसाठी तत्पर असतील.

मध्यप्रदेशच्या धर्तीवर जेईई आणि नीट परीक्षार्थींना मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करावी तसेच विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष बसेस सोडाव्यात, वाढीव व पर्यायी वाहतूक व्यवस्थेची तयारी करावी, अशी मागणी विक्रांत पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.