Pimpri News: पत्रकारिता हे पैसे कमविण्याचे साधन नव्हे – कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – पत्रकारिता ही सामाजिक सेवा आहे. पैसे कमविण्याचे साधन नाही. परंतु, सध्याच्या काळात त्याचा व्यवसाय झाला असल्याचे परखड मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शिवाजीराव शिर्के, मधू जोशी, माधवराव सहस्त्रबुद्धे, राजन वडके या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व महापौर उषा ढोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

तत्पूर्वी दर्पणकार आचार्य बाळकृष्ण शास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्यासह शहरातील पत्रकार उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी स्वतः वर्तमानपत्रांमध्ये संपादक म्हणून काम केल्याचे सांगितले.

महापौरांनी पत्रकारिते बरोबरच जाहिरातीही महत्वाच्या असल्याचे मत व्यक्त केले. नाना कांबळे यांनी प्रास्ताविक केले. दादा आढाव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.