Pimpri News:  ‘कोविशिल्ड’ची टंचाई कायम! रविवारीही फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला सलग तिसऱ्या दिवशी कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे उद्या (रविवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ‘या’ केंद्रांवर लस मिळणार!

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे ‘कोव्हॅक्सिन’चा 200 च्या क्षमतेने पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या आणि कोविन अॅपवरुन बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे या केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत.

45 वर्षापुढील नागरिकांना ‘या’ केंद्रांवर मिळणार पहिला, दुसरा डोस!

प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा आणि प्रेमलोक पार्क दवाखाना येथे ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.  ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन, किऑस्क प्रणालीद्वारे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.   ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.