Pimpri News : क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली – महापौर 

एमपीसी न्यूज – स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान अतिशय मोलाचे आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळेच आजची स्त्री पंतप्रधान, राष्ट्रपती, महापौरपदी विराजमान होऊ शकली, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पिंपरी चौक येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे ‘मी सावित्रीबाई बोलते’ या एकपात्री प्रयोगाचे उद्धाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य सुरेश भोईर, नगरसदस्या माधवी राजापुरे, सुवर्णा बुरुडे, आश्विनी जाधव, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, भाई विशाल जाधव, संतोष गोतावळे, शंकर लोंढे, महावीर जाधव आदी उपस्थित होते.

पिंपरी चौक येथील महात्मा ज्योतीराव फुले पुतळा परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसदस्या माधवी राजापुरे, सुवर्णा बुरुडे, आश्विनी जाधव, माजी नगरसदस्य मारुती भापकर, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, ॲड. उर्मिला काळभोर, सुरेखा बुरुडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रतापराव गुरव, अरुण बकाल, आनंदा कुदळे, भाई विशाल जाधव, देवेंद्र तायडे, गिरीश वाघमारे, नेहुल कुदळे, संतोष जोगदंड, हनुमंत घुगे, विलास गव्हाणे, हनमंत माळी, वैजनाथ शिरसाठ, काळूराम गायकवाड, अनिल साळुंखे, मारुती कदम, वैजनाथ माळी, संतोष जाधव, अशोक लोंढे, अमोल पल्हाडे, गुलाब पानपाटील, भारतराज मोरे, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. विद्या शिंदे, वंदना जाधव, सोनाली कुदळे, वर्षा जगताप, डॉ. वर्षा कुदळे, डॉ. ऐश्वर्या कुदळे, कविता खराडे, पूजा वायचळ, सविता खराडे, नंदा करे, वैशाली राऊत, सुनीता जमदाडे, मीरा कुदळे आदी उपस्थित होते.

मोशी येथील महानगरपालिकेच्या शाळेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर केशव घोळवे, माजी आमदार विलास लांडे, नगरसदस्या माधवी राजापुरे, सुवर्णा बुरुडे, आश्विनी जाधव, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी नगरसदस्य धनंजय आल्हाट, अरुण बोऱ्हाडे, दिलीप बोऱ्हाडे, मुख्याध्यापक विठ्ठल मुंढे आदी उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात शारदाताई मुंढे यांनी ‘मी सावित्रीबाई बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये रेश्मा गायकवाड, रंजना धुमाळ, ॲड. प्रीती पंडीत, शनिता पवार, पिनल वानखेडे, डॉ. माधुरी शिंगाडे, अर्चना सावंत, सोनाली कुदळे, कविता जगताप, सुनिता इसकांडे, शिप्रा नानजकर, मीनाक्षी राळे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

प्रास्ताविक भाई विशाल जाधव यांनी तर गिरीश वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शासनाने, स्त्रियांच्या मुक्तीदात्या असणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची असुन त्यांचे शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे व त्यांनी रूजविलेले शैक्षणिक मुल्ये पुढील पिढीत संक्रमित होणे गरजेचे आहे हे ओळखून सावित्रीबाई फुले यांची जयंती निबंध लेखन, एकांकिका अशा विविध उपक्रमाद्वारे ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेने उपक्रम राबविलेले आहेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित रांगोळी चित्रे महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये विजय शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारली आहेत.

या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सावित्रीबाई फुले महिला व्यासपीठ, ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी संघर्ष सेना, महाराष्ट्र परिट सेवा मंडळ, पिंपरी चिंचवड शहर लॉंड्री संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, नागरी हक्क सुरक्षा समिती यांनी देखील कार्यक्रम यशस्विततेसाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.