Pimpri News : कामगार नेते विजयसिंह कदम यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसीन्यूज : ग्रीव्हज कॉटन अँड अलाइड कंपनीज एम्प्लॉईज युनियनचे जॉईंट जनरल सेक्रेटरी, ‘आयटक’चे प्रदेश सदस्य सदस्य व पुना एन्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष कॉम्रेड विजयसिंह विठ्ठल कदम यांचे आज, शुक्रवारी कोरोनामुळे निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी व संग्राम पतसंस्थेच्या संस्थापिक संचालिका माधवी, मुलगा ॲड. जयदिप, सून ॲड. धनश्री, दोन विवाहित मुली व चार नांतवडे असा परिवार आहे.

कदम यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात २३ दिवस उपचार सुरु होते. अखेर उपचारादरम्यान आज, त्यांची प्राणज्योत मालवली. कदम यांच्या आकस्मिक निधनामुळे संघटनेचे एक लढाऊ नेतृत्व हरपले आहे. संघटनेच्या सर्व सभासद आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत अखेरचा लाल सलाम केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.