Pimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू

एमपीसी न्यूज – पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आयोजित सेवासप्ताह अंतर्गत आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये महिला सक्षमीकरणाकरीता उपयुक्त असलेले Vikasini.in हे व्यावसायिक संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे व महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते मोरवाडी येथील भाजपा कार्यालयात त्याचे आज (बुधवारी) उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, युवा मोर्चा चिटणीस मुक्ता गोसावी, विक्रांत गंगावणे, प्रकाश चौधरी, निलेश नेस्त्री आदी उपस्थित होते.

आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत हे वेबपोर्टल मुक्ता गोसावी यांनी विकसित केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून महिला व्यावसायिक व बचत गटांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन त्यांची उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी एक ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

तसेच महिलांना व बचतगटांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या वेबपोर्टलच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

यामुळे महिला व बचतगटांना उद्योग-व्यवसाय वाढीसाठी मदत होऊन रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती आमदार लांडगे यांनी दिली.

Vikasini.in या पोर्टलच्या माध्यमातून प्रथमत: शहरातील बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलांच्या आवडीनुसार त्यांना कुठल्या उद्योग क्षेत्रात रस आहे, महिला कोणता उद्योग सुरु करु शकतात त्याबाबतची माहिती घेतली जाईल.

त्यानंतर त्यासाठी इच्छुक महिलांचे गट करुन उद्योग-व्यवसाय संबधित प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे, असे युवा मोर्चा चिटणीस मुक्ता गोसावी यांनी सांगितले.

शहरातील ज्या महिला सद्यस्थितीत स्वत:चे उत्पादन करीत आहेत त्यांना मर्यादीत स्वरुपातच बाजारपेठ उपलब्ध होत आहे. परंतु, या वेबपोर्टलच्या माध्यमातून त्यांना देशभरात ऑनलाईन विक्री करता येणार आहे. महिला सबलीकरणासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे.

यातून महिलांना आर्थिक बळकटी मिळणार असल्याने त्यांचे उद्योग-व्यवसायाला चालना मिळणार आहे. याकरीता प्रत्येक प्रभागात पदाधिकारी व नगरसेवकांनी महिला बचत गटांना या वेबपोर्टलबाबत माहिती होण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.