Pimpri News : ‘नाताळच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था राखावी’

आमदार अण्णा बनसोडे यांचे पोलिस प्रशासनाला आवाहन

एमपीसीन्यूज : डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सर्वांसाठी खास सेलिब्रेशनचा असतो. 25 डिसेंबरला नाताळ (ख्रिसमस डे) असतो. हा ख्रिसमस डे साजरा करण्यासाठी सर्व स्तरातून जय्यत तयारी केली जाते. त्यानंतर येणारे नववर्षाचे स्वागत म्हणजे एक प्रकारचा जल्लोष. या पार्श्वभूमीवर शहरात अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात, असे आवाहन आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे.

नाताळ निमित्त मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करत नवीन ठिकाणी फिरायला जाणे म्हणजे सेलिब्रेशन ही नवी टूम सध्या प्रचलीत होत आहे. या नाताळची मौजमजा संपते न संपते तोच नवीन वर्षाचा अनमोल क्षण येतो. नववर्षाचे स्वागत म्हणजे एक प्रकारचा जल्लोष.

नवी उमेद, नवी ताकद, नवी आशा, नवी दिशा असे सर्वच काही. त्यामुळे जुन्या वर्षाला गुड बाय म्हणत नवीन वर्षाला वेलकम म्हणण्यासाठी जगभर प्रत्येकजण आतुर असतो.

शहरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी गस्त वाढविणे आवश्यक आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला डंक अँण्ड ड्राईव्हची घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच मद्य सेवनाचे परवाने सुद्धा पोलिस खात्याकडून वाटले जातात. त्यावरही निर्बंध लावणे आवश्यक आहे.

_MPC_DIR_MPU_II

सुरक्षा बंदोबस्ताला फाटा देत, वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करावी, असे आवाहन आमदार बनसोडे यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे तरुणाईला संदेश देताना बनसोडे यांनी सांगितले की, जुन्या वर्षाला गुडबाय म्हणत नवीन वर्षाचे स्वागत करताना गतवर्षाबद्दल चिंतन करायला हवे.

मागील वर्ष सुरू होताना आपण काही गोष्टी ठरवलेल्या होत्या का… त्या कितपत पूर्ण झाल्या… कोणत्या गोष्टींमध्ये कमी पडलो… कोणत्या गोष्टींमध्ये आपण परिपूर्ण झालो… याचा विचार करायला हवा. तरुण-तरुणींनी तर आवश्यक हा विचार करायला हवा.

कारण हे संपूर्ण वर्ष कोरोना महामारीच्या विळख्यात गेले. यामुळे झालेले नुकसान कसे भरून काढायचे, यासाठीचे नवे संकल्प काय सोडायचे याबाबत सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित आहे. यावेळी आमदार बनसोडे यांनी पिंपरीकरांना तसेच तरुणाईला नाताळसह नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1