Pimpri News: कोरोनाला हरविणारे योद्धे डॉ. लक्ष्मण गोफणे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

कोरोना रुग्णांची सेवा करत असताना नकळतपणे डॉ. गोफणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकांना कोरोनाच्या दाढेतून बाहेर काढताना नकळतपणे पालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना कोरोनाची बाधा झाली. जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर यशस्वीपणे मात करत ते पुन्हा कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहेत. खरे कोरोना योद्धे डॉ. गोफणे यांचा महापौर उषा ढोरे यांनी विशेष सत्कार केला.

महापौर दालनात सोमवारी (दि.31) हा कार्यक्रम झाला. महापौर ढोरे यांनी पुस्तक, पुष्प देऊन डॉ. गोफणे यांचा गौरव केला.

कोरोना महामारीत पालिकेचे भोसरीतील नवीन रुग्णालय बाधितांसाठी वरदान ठरत आहे. कोरोनाच्या भीतीने कोण काम करण्यासाठी पुढे येत नसताना डॉ. लक्ष्मण गोफणे स्वतःहून पुढे आले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून जबाबदारी मागवून घेतली. संपूर्ण भोसरी रुग्णालयाची जबाबदारी डॉ. गोफणे यांनी घेतली.

यंत्रणा उभी करत आणि डॉक्टरांची टीम घेत त्यांनी कोरोना विरोधातील लढाई सुरू केली. शहरातील अनेक बाधितांना डॉ. गोफणे यांनी कोरोनाच्या दाढेतून अलगदपणे बाहेर काढले. कोरोना काळात चार महिने डॉ. गोफणे घरी देखील गेले नव्हते. गेस्ट हाऊसवर राहिले. एवढे झोकून देऊन त्यांनी कोरोना कालावधीत काम केले.

कोरोना रुग्णांची सेवा करत असताना नकळतपणे डॉ. गोफणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. आता पुन्हा डॉ. गोफणे कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहेत. कोरोनाला हरवून रुग्णसेवेत दाखल झाल्याने महापौर उषा ढोरे यांनी डॉ. गोफणे यांचा विशेष सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.