Pimpri News : शस्त्रावरील नियंत्रणासाठी पुणे पोलिसांच्या धोरणाचा आधी अभ्यास करु –  विनयकुमार चौबे

एमपीसी न्यूज – शहरात अगदी 18 ते 20 वर्षांच्या मुलाच्या हातात कोयता, तलवार सारखे घातक शस्त्र असल्याचे व्हॉटसअप स्टेटस वर दिसत होते. त्यावर नियंत्रण यावे यासाठी ही मोहीम राबविली आहे. पुणे पोलिसांनी कोयता खरेदीवेळी जी अधारकार्डची अट घातली आहे त्या (Pimpri News)अटीचा आम्ही पण विचार करत आहोत. मात्र शहराचा विचार करता पिंपरी-चिंचवड मध्ये ते शक्य आहे का, याचा एकंदर आढावा घ्यावा लागेल, असे मत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी व्यक्त केले आहे.

पोलीस आयुक्त शनिवारी (दि. 4) आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पत्रकारांनी पुण्यात पोलीस आयुक्तांनी कोयता गँगवर नियंत्रण आणण्यासाठी कोयता खरेदीवेळी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. या धर्तीवर आपणही तशी योजना पिंपरी-चिंचवड शहरात राबविणार का असा प्रश्न विचारला असता चौबे म्हणाले की,  शस्त्र तयार झाल्यानंतर ते एका साखळीच्या माध्यमातून शहरात येतात. ही साखळी मोडून मुळापर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे.

 

Urse Tollnaka News : ट्रकचालकाला मारहाण करत लुटणाऱ्याला अटक

त्यासाठी आम्ही पोलीस ठाणे व इतर तपास पथकांच्या माध्यमातून अभ्यास करत आहोत. शस्त्र पुरवठादारांच्या मुळावर घाव घातला तर मोठ्या प्रमाणात या गुन्हेगारीवर आळा बसेल. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करुनच हा उपक्रम राबविण्याचा विचार करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील 15 दिवसात केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र याच्या दुसऱ्याा बाजूचा विचार करायचा झाला तर शहरात सापडलेली शस्त्रसंख्या देखील (Pimpri News)विचार करायला लावणारी आहे. कारण पंधरा दिवसात पोलिसांनी तब्बल 205 कोयता व तलवारी अशी धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. तर 48 पिस्टल जप्त केल्या आहेत. यावेळी पोलिसांनी हातात कोयते घेऊन व्हॉटसअप स्टेटसवर दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वर्गाला टार्गेट केले.

यात 16 ते 20 वयोगटातील मुले होती. त्यांना हे शस्त्र अगदी सहज उपलब्ध होतात. त्यातूनच रस्त्यात नागरिकांना अडवून लुटणे, किरकोळ कारण किंवा दहशतीसाठी कोयत्याने वार करणे, वाहनांची तोडफोड अशा गुन्ह्यांना सुरुवात होते. याच गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी शहरात होणाऱ्या शस्त्र पुरवठ्याला निर्बंध घालणे गरजेचे आहे. यावर पोलीस आता लक्ष  केंद्रीत करणार असून पुढेही ही कारवाई अशीच चालू (Pimpri News)राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.