Pimpri News: पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी न करता राज्य शासनाकडून जनतेची लूट; भाजपचा आरोप

एमपीसी न्यूज – केवळ अहंकारापोटी राज्य सरकार पेट्रोल – डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी  केला.

पेट्रोल व डिझेल दरवाढीबाबत आमदार लांडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात पेट्रोलवर 32 रुपये 15  पैसे इतका व्हॅट आकारला जातो आहे. केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर भाजपाशासित राज्यांनी पेट्रोल – डिझेलवरील व्हॅट तातडीने कमी केला. मात्र महाराष्ट्र , राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांनी पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट कमी केला नाही.

राज्यांनीही आपल्या अखत्यारीतील करांचे ओझे कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा होती. पण, राज्य सरकारने कमी केला नाही. राज्यातील पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.