Pimpri news: राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या शहराध्यक्षपदी माधव धनवे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या पिंपरी -चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी माधव धनवे-पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील यांनी याबाबत घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते धनवे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर लिगल सेलचे अध्यक्ष गोरक्षनाथ लोखंडे, सोशल मीडिया अध्यक्ष समीर थोपटे आदी उपस्थित होते.

माधव पाटील म्हणाले की, पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड यांना पिंपरी-चिंचवड शहरामधून भरघोस मताधिक्य देणार आहोत. उद्योगनगरीतील पदवीधरांच्या आणि शिक्षकांच्या समस्या वेळोवेळी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावू.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.