Pimpri News: पाणी शिरत असलेली नदीलगतची ठिकाणे निश्चित करून आराखडा तयार करा – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेवून यावर्षीच्या पूरनियंत्रण व्यवस्थापनाचे नियोजन करावे यासाठी सर्व अधिका-यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी. नदीलगतची पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करून आराखडा तयार करावा, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिका, पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त पूरनियंत्रण आराखडा नियोजन बैठक आयुक्त पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवारी) संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी वरील आदेश दिले.

_MPC_DIR_MPU_II

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळबे, मुख्यलेखापरिक्षक आमोद कुंभोजकर, नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहशहर अभियंता रामदास तांबे, मकरंद निकम, प्रवीण लडकत, श्रीकांत सवणे, अशोक भालकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे डिविजनल इंजिनीअर राहुल गवारे, वायफळकर सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील आदी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे सन 2021 च्या पूरनियंत्रण आराखड्याची माहिती दिली. नदीलगतची पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा असे नमूद करून आयुक्त राजेश पाटील म्हणाले, पावसाळ्यात वादळी वा-यासह झाडे उन्मळून पडून मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून धोकादायक वृक्षाची छाटणी करून घ्यावी.

महापालिकेच्या ह्द्दीमध्ये झालेल्या आपत्तीजन्य घटनांची माहिती नियंत्रण कक्षास देणे, नदीपात्रालगत पात्रातील झोपडपटटया व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून योजना ठरविणे. नदी पात्रातील अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करणे, नदी पात्रातील गाळ तसेच जलपर्णी काढणे, तसेच धोकादायक जागांचे सर्वेक्षण करणे, गटार सफाई करणे व औषधी फवारणी करणे, पालिकेच्या हद्दीतील सर्व जुन्या इमारतीचे वाडयाचे बांधकाम तपासणी (Structural Audit) आदी कामे पावसाळ्यापूर्वी करून घेण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.