Pimpri News : कोरोना रुग्णांना अल्पदरात प्लाझ्मा उपलब्ध करा : भाजपा युवा मोर्चा

एमपीसीन्यूज : सध्याच्या काळामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका रुग्णांलयांमध्ये या रुग्णवाढीचा ताण येत आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्लाझ्माची मागणीही वाढली आहे. त्यामुळे रुग्णांना अल्पदरात प्लाझ्मा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महापौर माई ढोरे, भाजप युवा मोर्चाचे संकेत चोंधे, दिनेश यादव, शिवराज लांडगे, उदय गायकवाड, पूजा आल्हाट, प्रकाश चौधरी, विक्रांत गंगावणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्लाझ्मा हे कोरोना लढ्याचं प्रमुख शस्त्र मानलं जात आहे. त्याचा वापर करुन कोरोनाग्रस्त व्यक्तींना बरे करता येणे शक्य आहे.

मात्र, सध्या प्लाझ्माची कमतरता जाणवत आहे. प्लाझ्मासाठी सहा हजार रुपये दर आकारला जात आहे. आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यात प्लाझ्मा साठी एवढी रक्कम देणे बहुतांश नागरिकांना शक्य होत नाही.

या प्रश्नी आयुक्तांनी लक्ष घालून पूर्वी प्रमाणे 400 रुपये घेऊन प्लाझ्मा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे निवेदनद्वारे केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.