Pimpri News: लसीअभावी अनेक केंद्रे बंद, 10 लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीचा साठ संपल्याने महापालिकेची अनेक केंद्रे बंद आहेत. सद्यस्थितीत केवळ 19 लसीकरण केंद्र चालू आहेत. 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. परंतु, आताच लसीचा साठा कमी आहे. महापौरांनी पुढील महिन्यात 10 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर केलेले आहे. वास्तविक केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा कमी असताना सत्ताधारी भाजप व महापौरांनी जाहीर केलेले  उद्धिष्ट  कसे साध्य करणार, असा सवाल शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला आहे

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात गटनेते कलाटे यांनी म्हटले आहे की,  शहरात एकूण 100 पेक्षा जास्त ( महापालिका 60 आणि खासगी – 29 ) लसीकरण केंद्रामधून नागरिकांना लस देण्याचे काम सुरु आहे. परंतु, आज केवळ 19 केंद्र चालू असून इतर केंद्र लसीअभावी बंद आहेत. लसीची उपलब्धता नसल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्र सरकारने 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केलेले आहे. 1 तारखेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देणार आहोत. असे असताना आज रोजी आपल्याकडे लसीचा साठा कमी आहे. तर आपण पुढे नियोजन कसे करणार आहोत, असा प्रश्न कलाटे यांनी केला आहे.

महापौरांनी पुढील महिन्यात 10 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर केलेले आहे. वास्तविक केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा कमी असताना सत्ताधारी भाजप व महापौरांनी जाहीर केलेले  उद्धिष्ट आपण कसे साध्य करणार? लसीकरण केंद्र आज दुपारी लसी अभावी बंद करावी लागतात किंवा मोठ्या प्रमाणात पूर्णपणे बंद ठेवावी लागतात.

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी पुर्तास कठोर निर्बंधाबरोबर लसीकरण करणे हा महत्वाचा पर्याय आहे. सर्व लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल अशा प्रकारचे नियोजन करून लसीकरणाचा कृती आराखडा जाहीर करावा. जेणे करून नागरिकांमध्ये लसीकरण बरोबरच लसीकरण केंद्राची जनजागृती होईल असे कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.