_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri news: मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर ‘संबळ बजाव’ आंदोलन

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिल्याने मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिल्याने मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चातर्फे आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचवड शहरातील खासदार, आमदारांच्या कार्यालयासमोर ‘संबळ बजाव’ आंदोलन करण्यात आले.

कोरोनामुळे सुरक्षित अंतराचे पालन करत मोजकेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगाव येथील कार्यालयापासून आंदोलनाला सुरुवात झाली होती.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील कार्यालयासमोर आणि भाजप शहराध्यक्ष,आमदार महेश लांडगे यांच्या भोसरीतील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या चिंचवड स्टेशन येथील कार्यालयासमोरील आंदोलनाने समारोप झाला.

आंदोलनात मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, छावा युवा मराठा महासंघाचे धनाजी येळकर पाटील, गणेश सरकटे, कृष्णा मोरे, लक्ष्मण रानवडे आदी उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मारुती भापकर म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने विविध आंदोलने केली आहेत. आरक्षणासाठी दुर्दैवाने 42 तरुणांचे बळी गेले आहेत. गरिबीमुळे हजारो मराठा समाजातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजात नाराजी निर्माण झाली आहे. सरकारने चांगल्या वकिलांमार्फत फेरविचार याचिका तातडीने दाखल करावी. यासंदर्भात केंद्र, राज्य सरकारने चालढकल केल्यास मराठा समाज गप्प बसणार नाही. उलट तीव्र आंदोलन केले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.