Pimpri News : ‘आप’च्या वतीने फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टीच्या वतीने फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यामध्ये सफाई कामगार, पोलीस कर्मचारी आणि रिक्षा चालक यांचा समावेश आहे. किवळे, विकास नगर व मुकाई चौक याठिकाणी आज (दि.16) हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आम आदमी पार्टी चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर सोनवणे, शहर उपाध्यक्ष महेश बिराजदार, महिला कार्यकर्ता तेजस्विनी आणि पिंपरी चिंचवड शहर सचिव राघवेंद्र राव उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

सफाई कर्मचारी स्वताःचा जीव धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवत आहेत. पोलीस कर्मचारी शहराची 24 तास सुव्यवस्था राखण्यासाठी काम करताहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असतानाही सामन्य नागरिकांना सेवा देत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

महेश बिराजदार आणि सागर सोनवणे यांनी महिला कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजनेबाबत मार्गदर्शन केले. तसेच, रिक्षा चालक व बांधकाम कामगारां साठी प्रत्येकी पाच हजार रुपये मदतीची आयुक्तांकडे मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.