Pimpri News : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मनोज गुंजाळचा महापौरांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – मनोज विष्णू गुंजाळ यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मनोजचा आज (मंगळवारी, दि.28) महापौर कक्षात महापौर माई ढोरे यांनी सत्कार केला.

यावेळी माजी नगरसेवक जयंत उर्फ आप्पा बगल, राजेंद्र राजापुरे, अतिश वारणे आदी उपस्थित होते.

मनोजने आपत्ती व्यवस्थापन ,रक्तदान, राष्ट्रीय साहसी शिबिर,जलसंवर्धन, हरीतगाव, अवयवदान, प्रौढ साक्षरता, उज्वल योजना अशा विविध उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला आहे. कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य वाटप केले, तसेच रक्तदान व प्लाझ्मा दान करण्यास स्वयंसेवकांना प्रेरीत केले. कोरोना काळात मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे याबाबत समाजमाध्यमाद्वारे जनजागृती केली. याबद्दल त्याला राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मनोज गुंजाळ याला पुरस्कार मिळाल्याची सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://mpcnews.in/national-service-scheme-award-presented-to-manoj-gunjal-from-moshi-by-president-245581/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.