Chinchwad News : श्रमिकांनी जागवल्या नारायण लोखंडे यांच्या स्मृती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, दिलासा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे यांच्या पुण्यस्मृती दिनी स्मृतीजागर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी श्रमिकांनी लोखंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

थरमॅक्स चौक जवळील कष्टकरी संघर्ष महासंघाच्या कार्यालयात मंगळवारी (दि.9) स्मृतीजागर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ‘पिंपरी चिंचवड इंडस्ट्रीज चेंबर’चे अध्यक्ष ॲड. अप्पासाहेब शिंदे, कामगार भूषण जयवंत भोसले, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते , वंदना थोरात, माधुरी जलमोलवार, राजेश माने,उमेश डोरले, सुखदेव कांबळे, ओमप्रकाश मोरे, कार्तिक सुतार, निरंजन लोखंडे उपस्थित होते.

पुरुषोत्तम सदाफुले यांनी नारायण लोखंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. आपल्या लोकशाही व्यवस्थेत आजही कामगार आणि शेतकरी त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

काशीनाथ नखाते म्हणाले, कामगारांच्या हक्कासाठी स्वातंत्र्याच्या 73वर्षात रस्त्यावर उतरून हक्कासाठी झगडावे लागते हे दुर्दैव आहे. कष्टकरी माणसांसाठी नवे कायदे होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सूत्रसंचालन दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केले. अर्चना कांबळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.