Pimpri News : मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्याकरता ‘एमआयडीसी’ने पुढाकार घ्यावा – गजानन बाबर ‘

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. शहराच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या उद्योगांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्याकरता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (‘एमआयडीसी’) पुढाकार घ्यावा. अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर नदी प्रदूषणाबाबत फौजदारी खटला दाखल झालेला आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण थांबवणे गरजेचे आहे. शहराच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या उद्योगांतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे आवश्यक आहे. या केंद्रसाठी आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (‘एमआयडीसी’) पुढाकार घ्यावा, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

‘एमआयडीसी’ने, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन चर्चेअंती योग्य निर्णय घ्यावा. नद्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्याची मागणी बाबर यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.