Pimpri News : उद्योगांच्या सांडपाण्यावर मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी ‘एमआयडीसी’ने पुढाकार घ्यावा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड परिसरातील घरगुती व औद्योगिक सांडपाणी पवना, मुळा व इंद्रायणी नदीमध्ये मिसळत असल्यामुळे नद्यांचे प्रदूषण होत आहे. नदी संवर्धनाच्या दृष्टीकोनातून शहरात मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी ‘एमआयडीसी’ने पुढाकार घ्यावा अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

गजानन बाबर यांनी याबाबत त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या निवेदनात असे म्हटले आहे की, घरगुती व औद्योगिक सांडपाणी पिंपरी-चिंचवड मधून वाहणार्‍या पवना, मुळा व इंद्रायणी नदीमध्ये मिसळत असल्यामुळे नद्यांचे प्रदूषण होत आहे. याची दखल घेत पर्यावरण विभागाने 26 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे फौजदारी खटला दाखल केला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र उभारण्याकरिता 27 ऑक्टोबर रोजी कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरण रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवड मधील जवळपास दहा वर्ष रखडलेला मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र प्रकल्प लवकरात लवकर उभारावा, यासाठी ‘एमआयडीसी’ने पुढाकार घ्यावा अशी मागणी गजानन बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.