Pimpri News: एमआयडीसीचा ‘या’ भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी ( दि.25) करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.

एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी व्ही, एसएसएनएल, दिघी, तळवडे, चाकण, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शुक्रवारी (दि.26) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीचे उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.