Pimpri News : मिलिटरी डेअरी फार्म पुलाच्या कामाचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म येथील (Pimpri News) बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. याबाबत महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत कामाचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे.

याविषयी माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, मी 19 मे 2017 रोजी महानगरपालिका आयुक्त यांना पहिले पत्र देऊन याविषयाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. 20 सप्टेंबर 2017 रोजी पुन्हा दुसरे पत्र देऊन पाठपुरावा केला. रेल्वे उड्डानपुलाचे काम तत्काळ मार्गी लागावे यासाठी स्वत: दिल्ली येथे जाऊन तत्कालीन रक्षामंत्री निर्मला सीतारामन यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
कमांडट, स्टेशन हेद्क्वार्टर, खडकी यांनी 22 ऑक्टोबर 2013 चे पत्रान्वये महापालिकेस संरक्षण विभागाने मंजूर केलेल्या रस्त्यांमधील पिंपरी डेअरी फार्म रस्ता यासाठी 2 कोटी 86 लाख 87 हजार 651 रुपये ( 8081.00 चौ.मी. क्षेत्रासाठी ) इतकी रक्कम संरक्षण विभागाकडे जमा करण्याबाबत कळविले होते.

त्यानुसार महापालिकेने संरक्षण विभागाकडे रक्कम जमा केलेली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेने संरक्षण विभागाचे सूचनेनुसार 11 फेब्रुवारी 2015 रोजीच्या पत्रान्वये ( अ.नं. 15– पिंपरी डेअरी फार्म ) नवीन रस्ता आखणी प्रकरण संरक्षण विभागास सादर केले. नवीन रस्त्याचे आखणी प्रकरणानुसार वाढीव 2717 चौ.मी.क्षेत्रासाठी संरक्षण विभागाने मंजूर केलेल्या 3550 प्रती चौ.मी.या जमीन दरानुसार वाढीव रक्कम महापालिका संरक्षण (Pimpri News) विभागास देण्यास तयार असून नवीन रस्ता आखणीनुसार महापालिकेने रेल्वे वरील उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे.

Pune : सुप्रिया ताईंनी लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले – विजय शिवतरे

महापालिकेने संरक्षण विभागास अदा केलेल्या रक्कमेच्या क्षेत्रफळा इतक्या क्षेत्रावर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास संरक्षण विभागाने त्वरित मंजूरी द्यावी अशी मागणी सीतारामन यांच्याकडे केली होती. यानंतर डिफेन्स इस्टेट ऑफिस पुणे व मिलेट्री डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन कर्नल ग्यान प्रकाश यांना भेटून उड्डाणपूलाच्या कामास परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली.सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे उड्डानपुलाचे काम मार्गी लागण्यात यश आले आहे असे वाघेरे सांगितले.

या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरीगाव, पिंपळेसौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे महापालिकेच्या वतीने रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश जारी केल्यामुळे पिंपरी येथील भुयारी मार्ग साई चौक, शगुन चौक पुलावरील वाहतुक कोंडी कमी होईल व पुणे मुंबई महामार्गाकडे येजा करण्यार्‍या नागरिकांसाठी सोयीचे होईल असे त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.