Pimpri News: ‘सीसीसी’ सेंटरच्या बिलांमध्ये कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार; शिवसेनेचा आरोप

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या काळात कोरोना सेंटरची मोठ-मोठी बिले अदा केली असून यामध्ये कोट्यवधी रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत कोरोना महामारीच्या संकटाचा फायदा घेऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणा-या सत्ताधारी भाजपचा शिवसेनेने जाहीर निषेध केला आहे.

याबाबत शिवसेनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाच रूपयांचे मास्क 20 रूपयाला, 500 रूपयांचे पीपीई किट 3 हजार रूपयांना, 180 रूपयांचे जेवण व नाष्टा 400 रूपयांना तसेच साबणापासून सॅनिटाझर पर्यंत प्रत्येक साहित्य किमतीपेक्षा जास्त दराने घेतले आहे.

तसेच अनेक संस्थांनी सीएसआरच्या माध्यमातून महापालिकेककडे मदत स्वरूपातून कोट्यावधी रूपयांच्या वस्तु दिल्या आहेत. त्याचाही हिशोब नाही.

दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचाच फायदा घेऊन महापालिकेबरोबर खासगी रूग्णालयात पैसे घेऊनच 24 कोविड सेंटरला परवानगी दिली. तीन प्रकारच्या निविदा काढल्या. यामध्ये एकात सर्व साहित्य, दुसऱ्यात पुरवठाधारकांचे मनुष्यबळ, तर मनुष्यबळ पुरवठाधारकाचे व बाकी आवश्यक गोष्टी महापालिकेच्या हे तिसऱ्या निविदेत होते.

_MPC_DIR_MPU_II

इमारत महापालिकेची व बाकी सर्व गोष्टी पुरवठाधारकाच्या, यामध्ये वेगवेगळ्या रकमा देण्याचे कबूल केले गेले होते. जवळजवळ 225 ते 250 कोटी पर्यंतची बिले अदा करण्यात आली आहेत.

प्रतिदिन, प्रति बेडचा दर 1239 निश्चित केला होता. पेशंट असू किंवा नसू एकूण बेडच्या कमीत कमी 80 % बेडचे बिल अदा करावेच लागत होते, असे असताना 3 महिन्यानंतर कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश असताना त्यानंतरच्या काळात एकही पेशंट नसताना 65 % प्रमाणे बेडचे बिल देण्याचे कारण काय ? हे म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखेच असल्याचा आरोपी शिवसेनेने केला आहे.

महापालिका आयुक्तांना हे सगळेच माहिती आहे. त्यांनी जाता-जाता या पापात सहभागी होऊ नये. दोन दिवसात याचा खुलासा समक्ष करावा. नाही तर शिवसेना पध्दतीने समजावून सांगितले जाईल. शिवाय या सर्व प्रकराची मुख्यमंत्र्याकडे याची तक्रार करावी लागेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

निवेदनावर भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, राहुल गवळी, युवा सेनेचे सचिन सानप यांच्या स्वाक्ष-या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1