Pimpri News : तरुणीच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी आमदार बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची मदत

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील तरुणीच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची मदत मिळाली आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी आमदार बनसोडे यांचे आभार मानले.

नायब मोहम्मद शकील शेख (वय 25, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी त्यांना साडेपाच ते सहा लाख रुपये खर्च सांगण्यात आला आहे. शेख यांना पिंपळे निलख येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेख यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी आमदार बनसोडे यांच्याकडे मदत मागितली. बनसोडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शेख यांना एक लाख रुपये मिळवून दिले. आमदार बनसोडे यांनी मदतीला धाव घेत एक लाखाचा मदत निधी मिळवून दिल्याबद्दल शेख यांनी आमदार बनसोडे यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.