Pimpri News: आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस दिव्यांग, मतीमंद बांधवांसोबत

एमपीसी न्यूज – सुनील लांडे युथ फाउंडेशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस गरजु, दिव्यांग, अंध आणि मतिमंद बांधवांसोबत साजरा केला. पिंपळेगुरव येथील इम्मानुएल अनाथालयातील नागरिकांना उबदार कपडे आणि जेवणाचे वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा 27 नोव्हेंबर रोजी वाढदिवस झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांडगे यांनी यंदा अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. कार्यकर्ते- समर्थकांना विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. आमदार महेशदादांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रम राबविले.

सुनील लांडे युथ फाउंडेशनच्या वतीने पिंपळेगुरव येथील इम्मानुएल आनाथालयात जावून वाढदिवस साजरा केला. गरजु, दिव्यांग, अंध आणि मतिमंध बांधवांना उबदार कपडे, जेवण देण्यात आले.

सामाजिक कार्यकर्त्या राखी धर, विजु ठोंबरे, विकास सरवदे, नितीन कदम, महादेव गुंडाले, श्रावण पाटील, मंगेश पालके, प्रथमेश शिंदे, प्रतिक खंदारे, आकाश वाघमारे आदी उपस्थित होते.

आमदार महेशदादांचा वाढदिवस म्हणजे आमचा सण असतो. हा सण आम्ही गरीबांसोबत साजरा केल्याचे फाउंडेशनच्या पदाधिका-यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.