Pimpri News: कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयूचे बेड मिळत नसल्याने मनसेचे आंदोलन

मनसेने आज (बुधवारी) महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. : MNS agitation as corona patients do not get ventilator, ICU beds

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयूचे बेड मिळत नसल्याचा आरोप करत मनसेने आज (बुधवारी) महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

मनसेचे पालिकेतील गटनेते, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राजू साळवे, विशाल मानकरी, बाळा दानवले, मयुर चिंचवडे, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, रवी जाधव सहभागी झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाणही जादा आहे. या रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयूचे बेडची आवश्यक असते. पण, त्यांना बेड उपलब्ध होत नाही. कोरोनामुळे दिवसाला 20 ते 25 जणांचा मृत्यू होत आहे.

शहरातील सद्याची स्थिती पाहाता सरकारी व खाजगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी फुल्ल आहेत. यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयातील आर्थिक खर्च परवडत नसल्यामुळे किंवा अशा लोकांना शहरामध्ये आयसीयु व व्हेंटीलेटरची सुविधा मिळत नसल्यामुळे कोरोना रुग्ण दगावत आहेत.

याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचे चिखले यांनी सांगितले. शहरामध्ये आत्तापर्यंत 685 कोरोना रुग्ण मृत झालेले आहेत, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.