Pimpri News: खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘ब्रिगेडियर’कडून घेतली रेडझोनची माहिती

संसदेच्या अधिवेशनात जोरदार आवाज उठविण्याची ग्वाही

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Dr. Amol Kolhe) यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सेवानिवृत्त ब्रिगेडियर एस.के. मोहन ( Retired Brigadier S.K. Mohan) यांच्याकडून रेडझोनची (Red Zone) सविस्तर माहिती घेतली. हा प्रश्न संसदेत कशापद्धतीने मांडला पाहिजे याबाबतही माहिती जाणून घेतली. त्यानंतर याप्रश्नी
आगामी संसदेच्या अधिवेशनात ( Sessions of Parliament) जोरदार आवाज उठविण्याची ग्वाही डॉ. कोल्हे यांनी दिली.

रेडझोन संघर्ष समितीच्या पुढाकाराने बिग्रेडियर मोहन आणि डॉ. कोल्हे यांची आज (शुक्रवारी) पुण्यात बैठक झाली. रेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, समितीचे सचिव मदन सोनिगरा, नरेंद्र भालेकर, देहूचे माजी सरपंच मधुकर कंद, ‘पीसीसीएफ’चे तुषार शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

याबाबतची माहिती देताना समितीचे अध्यक्ष सुदाम तरस म्हणाले, संरक्षण खात्याच्या ( Defence Department) वैज्ञानिकांनी रेडझोनची मर्यादा 270, 400 मीटर असावी, अशी नियमावली दिली आहे. ती पाळणे आर्मी (Army), नेव्ही (Nevy), एअरफोर्स (Airforce)  या तीनही दलांना बंधनकारक आहे. काही ठिकाणी 500, 100, 1500, 2000 हजार मीटर यार्डचा रेडझोन लावला आहे. त्यामुळे भारतभर गोंधळ उडाला आहे.

रेडझोनच्या जागा मिलिट्रीच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे लष्करी आस्थापनाची सुरक्षितता धोक्यात आली. यामुळे सन 2016 मध्ये रेडझोनची मर्यादा काही ठिकाणी 10, 50, 100 मीटर लागू केली. तर, काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त अंतराचे रेडझोन लावले आहेत. कुठे 900, 1145, 2000 मीटर लावले आहेत. हा अट्टाहास कशासाठी, कायद्यात बसत नाही ते लष्कर का करत आहे, असा प्रश्न तरस यांनी उपस्थित केला.

या विषयाची डॉ. कोल्हे यांनी सविस्तर माहिती घेतली आहे. तो संसदेत कसा मांडावा हे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवृत्त ब्रिगेडियर एस.के. मोहन यांच्याकडून समजावून घेतले. मोहन हे देहूरोडला 2005 मध्ये कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले असून सर्वोच्च न्यायालयात वकिली करत आहेत.

डॉ. कोल्हे यांनी खासदार झाल्यानंतर माझ्याकडून रेडझोनचा विषय समजावून घेतला होता. माझ्या विनंतीनुसार त्यांनी ब्रिगेडियर मोहन यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. रेडझोनची संपूर्ण माहिती आहे, पण तो संसदेत कशा पद्धतीने माडांयचा याची माहिती डॉ. कोल्हे यांनी घेतली. याप्रश्नी संसदेत जोरदार आवाज उठविण्याची ग्वाही कोल्हे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.