Pimpri News: पालिका प्रशासनाला केवळ निविदांमध्ये रस – खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – पुणे पालिकेने गणेश विसर्जनासाठी फिरते हौद केले आहेत. मूर्तीदान उपक्रम राबविला जात आहे. पण, पिंपरी पालिकेने कोणतीही व्यवस्था केली नाही. पालिका प्रशासन केवळ निविदा प्रक्रियेत गुंतले असल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

खासदार बारणे म्हणाले, राज्य सेवेतील अतिरिक्त, उपायुक्त, सहाय्यक दर्जाचे अधिकारी केवळ ‘मलिदा’ मिळतो यासाठी प्रतिनियुक्तीवर पालिकेत येतात. पालिकेच्या पैशांवर डोळा ठेवून चांगल्या ठिकाणी त्यांना ‘पोस्टिंग’ पाहिजे असते. त्यांना कामात अजिबात रस नाही. शहर विकास, धार्मिक कार्यक्रमांचे देखील नियोजन त्यांच्याकडून केले जात नाही.

कोरोना परिस्थितीची जाणीव असतानाही या अधिका-यांनी गणेशोत्सवाचे कोणतेही नियोजन केले नाही. गणेश भक्तांच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे, असा आरोप खासदार बारणे यांनी पालिका प्रशासनावर केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.