Pimpri News : विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंचा महापालिकेतर्फे गौरव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराने अनेक जिल्हा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविले असून त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे शहराच्या नाववलौकिकात भर पडली, असल्याचे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.

शहरातील विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गुणगौरव तसेच प्रशिक्षकांचा ऑनलाईन सत्कार समारंभ महापौर ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य संदीप वाघेरे, शैलेश मोरे, नगरसदस्य अनुराधा गोरखे, योगिता नागरगोजे, निर्मला गायकवाड, क्रीडा विभागाचे उपआयुक्त संदीप खोत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, क्रीडा शिक्षक संजय नागपुरे, शितल मारणे उपस्थित होते.

शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महापालिका नेहमी प्रयत्नशील असते. विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करताना शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला त्याला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला असून खेळाडूंनी आपली खिलाडू वृत्ती जोपासावी तसेच त्यांना भविष्यातील कामगिरीसाठीही शुभेच्छा दिल्या.

विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेले खेळाडू

भांडारपाल विवेक मालशे यांची All India Cricket Association of Deaf या संघटनेच्या सहसचिवपदी निवड, तेजस्वी काटे हिने लॉनटेनिसमध्ये 5 व्या ५ एशियन स्पर्धेत ब्राँझ पदक, खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत 4 वेळा सहभाग, 4 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, वैष्णवी जगताप, जलतरण (दिव्यांग खेळाडू) हिने एशियन युथ पॅरा गेम – सहभाग कॉमनवेल्थ वेल्थ गेम –6th position, राष्ट्रीय स्पर्धेत 21 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक, 4 ब्राँझ पदक, राज्यस्तर स्पर्धेत – 19 सुवर्ण पदक, मंगेश कदम, डिकॅथलॉन (मैदानी) राष्ट्रीय स्पर्धेत 4 वेळा सहभागी, 31 वी जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड, चंद्रशेखर कुदळे – राष्ट्रीय प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच, रूस्तम पठाण महापालिका क्रीडा विभाग – राष्ट्रीय खेळाडू, पोलवॉल्ट, राष्ट्रीय प्रशिक्षक, श्वेता कदम रोलबॉल – 17 वी सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची कर्णधार – स्पर्धेत द्वितीय क्रमांक, वैष्णवी कुलकर्णी, रोलबॉल – द्वितीय क्रमांक, रफीक इनामदार – राष्ट्रीय प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच, स्वराज राजेंद्र मोरे स्केटींग व सायकलिंग – स्केटींग – 6 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत – 1 रौप्य व 2 कांस्य 13 वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग सायकलिंग 4 वेळा राज्यस्तर स्पर्धेत सहभाग, 1 वेळा विद्यापीठ स्पर्धेत सहभाग, पियुष दयाराम क्षिरसागर, रोलबॉलव रोलरहॉकी – मेजर ध्यानचंद पुरस्कार 2020, अनिकेत हरोले (पिस्तुल) – 2 वेळा राज्यस्तर आणि 1 वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

तसेच ईशा सारसर (पिस्तुल) – 6 वेळा राज्यस्तर तर 2 वेळा पूर्वराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, चिन्मय घांगुर्डे (पिस्तुल), मेहेक शेख (पिस्तुल), आर्या सोनवणे (पिस्तुल), श्वेता वाळूंज (पिस्तुल), गजानन खंडागळे (रायफल), तन्मय राईलकर (रायफल), आरोही पूर्णेये (रायफल), रिया पाटील (रायफल), यजत नारखेडे (रायफल), पार्थ माने (रायफल), अर्जून कदम (रायफल) राज्यस्तर स्पर्धेत सहभागी झाले होते.

संवेदना खांबे (प्रशिक्षक) राष्ट्रीय खेळाडू असून 15 वेळा राष्ट्रीय स्पर्धत 1 सुवर्ण, 2 रोप्य पदक, 1 कांस्य पदक, 25 वेळा भारतीय निवड चाचणी स्पर्धेत सहभाग झाला होता. सौरभ साळवणे (मुख्य प्रशिक्षक) राष्ट्रीय खेळाडू असून आंतरराष्ट्रीय रेफरी प्रशिक्षण दिलेले खेळाडू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.