-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News : महापालिकेत आता 10 उपआयुक्त तर 14 सहाय्यक आयुक्त

नव्याने 2 उपआयुक्त, 4 सहाय्यक आयुक्तपदांच्या निमिर्तीस राज्य सरकारची मान्यता

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भविष्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा होणारा विस्तार, वाढलेली लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने कामकाजात होणारी वाढ विचारात घेवून महापालिकेच्या मागणीनुसार 2 उपआयुक्त आणि 4 सहाय्यक आयुक्त पदांच्या निमिर्तीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत आता 10 उपआयुक्त आणि 14 सहाय्यक आयुक्त असणार आहेत. राज्यसेवेतील 5 उपआयुक्त, 7 सहाय्यक आयुक्त आणि पालिका सेवेतील 5 उपआयुक्त, 7 सहाय्यक आयुक्त असा ‘कोटा’ निश्चित केला आहे.

पिंपरी महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. पालिकेच्या नवीन आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियमांना मंजुरी मिळाली असून नवीन आकृतीबंधानुसार उपआयुक्तांच्या पदाची निर्मिती झाली आहे.

महापालिका आस्थापनेवर सध्या उपआयुक्त संवर्गाची 8 पदे व सहाय्यक आयुक्त संवर्गाची 10 पदे मंजूर आहेत. भविष्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा होणारा विस्तार, वाढलेली लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने कामकाजात होणारी वाढ विचारात घेवून आयुक्त राजेश पाटील यांनी उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्त या संवर्गातील वाढीव पदांची आवश्यकता दर्शविली होती. त्याअनुषंगाने उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त संवर्गातील नवीन पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महापालिका पत्राच्या अनुषंगाने पालिका आस्थापनेवर उपआयुक्त संवर्गातील 2 पदे आणि सहाय्यक आयुक्त संवर्गातील 4 पदे नव्याने निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या पदांना महापालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, 2020 मधील तरतूदी लागू राहतील.

महापालिकेच्या आस्थापनेवरील उपआयुक्त व सहाय्यक आयुक्त पदांना असलेली शासनमान्य वेतनश्रेणी या पदांनाही लागू राहील, असे शासनाचे उपसचिव स. ज. मोघे यांनी स्पष्ट केले आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

राज्य सेवेतील 2, पालिका सेवेतील 1 अशी उपआयुक्तांची 3 पदे रिक्त

राज्य सेवेतील महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेले प्रशासन विभागाचे उपआयुक्त सुभाष इंगळे, नागरवस्ती विभागाचे अजय चारठणकर आणि कर आकारणी व संकलन विभागाच्या स्मिता झगडे महापालिकेत कार्यरत आहेत. राज्य सेवेतील 2 उपआयुक्तपदे रिक्त आहेत.

तर, महापालिका सेवेतील भांडार विभागाचे मनोज लोणकर, कायदा विभागाचे चंद्रकांत इंदलकर, सुरक्षा विभागाच्या आशादेवी दुरगुडे आणि क्रीडा विभागाचे संदीप खोत असे 4 उपआयुक्त कार्यरत आहेत. पालिका सेवेतील अधिका-यासाठीचे 1 पद रिक्त आहे.

महापालिका सेवेतील अधिका-यांची 4 सहाय्यक आयुक्तपदे रिक्त !

राज्य सेवेतील एलबीटी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील आलमलेकर, निवडणूक विभागाचे बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, प्रशासन विभागातील सुषमा शिंदे, आकाश चिन्ह परवाना विभागाचे निलेश देशमुख, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे उमाकांत गायकवाड, शिक्षण विभागाच्या ज्योत्स्ना शिंदे असे 7 जण कार्यरत आहेत. राज्य सेवेतील कोटा फुल झाला आहे.

तर, महापालिका सेवेतील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे अण्णा बोदडे, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे श्रीनिवास दांगट आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सिताराम बहुरे असे 3 जण सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. महापालिका सेवेतील अधिका-यांसाठी राखीव असलेली 4 सहाय्यक आयुक्तपदे रिक्त आहेत.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.