Pimpri News: महापालिका एक कोटींच्या शालेय वह्यांची थेट पद्धतीने खरेदी करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील ( Pimpri chinchwad Municipal School)  विद्यार्थ्यांसाठी महापालिकेकडून शालेय वह्या ( School Book) थेट पद्धतीने खरेदी ( Directly Purchase) करण्यात येणार आहेत. पुरवठाधारक सनराज प्रिंटपॅक इंडस्ट्रीज ( Sunraj Printpack Industries) यांच्यामार्फत एक कोटी 31 लाख 41 हजार रुपयांच्या वह्या खरेदी करण्याच्या सदस्य प्रस्तावाला स्थायी समितीने (बुधवारी) आयत्यावेळी मान्यता दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शहरातील शाळा 4 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य गतवर्षीच्या पुरवठाधारकांकडून गतवर्षीच्या दराने खरेदी समितीच्या शिफारसीनुसार खरेदी करण्यात येणार आहे.

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता साहित्य वाटप करण्याच्या आदेशास खरेदी समिती आणि आयुक्तांनी मान्यता दिली आहे. तसेच याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. न्यायालयाने 1 ऑक्टोबर 2020 रोजी नव्याने निविदा कार्यवाही न करण्याबाबत आदेश दिले आहेत.

त्यानुसार शिक्षण समितीने मागणी केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांकरिता शालेय वह्या देण्यात येणार आहेत. पुरवठाधारक सनराज प्रिंटपॅक इंडस्ट्रीज यांच्यामार्फत एक कोटी 31 लाख 41 हजार रुपयांच्या वह्या खरेदी करण्यात येणार आहेत.

लेखाशिर्ष शालेय वह्यावरील उपलब्ध तरतूद दोन कोटी या तरतूदीमधून येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.