Pimpri News: महापालिका जलतरण तलावांची खोली कमी करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी, मोहननगर, चिंचवड, भोसरी, थेरगाव येथील जलतरण तलावांची खोली जास्त आहे. जीवितहानी होऊ नये यासाठी या पाच जलतरण तलावांची खोली कमी करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वतीने 12 जलतरण तलाव चालविले जातात. त्यापैकी 7 जलतरण तलावांची खोली कमी आहे. आकुर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाची उंची 3.50 X 16 फुट आहे.

तर, मोहननगर चिंचवड येथील राजर्षी शाहु महाराज जलतरण तलाव, केशनगर चिंचवड येथील कै. वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलाव, भोसरी जलतरण तलाव आणि थेरगावातील खिंवसरा पाटील जलतरण तलावाची उंची 3.50 X 14 फुट आहे. या पाच जलतरण तलावांची खोली जास्त आहे.

_MPC_DIR_MPU_II

उन्हाळी सिझनमध्ये सर्वच जलतरण तलावांवर पोहणारे क्रीडा प्रेमी, नागरिक, जलतरण खेळाडू यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीमध्ये नवखे पोहणारे नागरिकांची जास्त संख्या असते. या पाच जलतरण तलावांची खोली जास्त असल्याने गर्दीमुळे अपघात, जिवीतहानी होऊ नये यासाठी तलावांची खोली कमी करण्यात येणार आहे.

आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत टेबल टेनिस सेंटर सुरु करणार

महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे टेबल टेनिस सेंटर करण्यात आले आहे. महापालिका परिसरात विविध ठिकाणी टेबल टेनिस सेंटर सुरु करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड टेबल टेनिस असोसिएशन यांनी केली आहे. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत टेबल टेनिस सेंटर सुरु केल्यास शहरात टेबल टेनिस खेळाडू तयार होण्यास मदत होईल.

त्यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत टेबल टेनिस सेंटर करण्यात येणार आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील टेबिल टेनस सेंटर यमुनानगर जलतरण परिसरात करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.