Pimpri News: महापालिका 1 कोटी 11 लाखांची शालेय पुस्तके आणि वह्यांची खरेदी करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ( Pimpri chinchwad Municipal ) बालवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता शालेय प्रयोग वह्या ( school experiment Books) , चित्रकला ( painting) आणि भूगोल नकाशा वह्यांची ( geography map Book) आणि विविध अभ्यासपूरक पुस्तकांची थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत. कौसल्या पब्लिकेशन ( kausalya Publication) यांच्याकडून 21 लाख 43 हजार 367 रुपयांच्या वह्या आणि 90 लाख 37 हजार 348 रुपयांची अभ्यासपुरक पुस्तके खरेदी करण्याच्या सदस्य प्रस्तावाला स्थायी समितीने ( sanding Committee)  आज (बुधवारी) आयत्यावेळी मान्यता दिली.

शहरातील प्राथमिक शाळा लवकरच सुरु होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्य गतवर्षीच्या पुरवठाधारकांकडून गतवर्षीच्या दराने खरेदी समितीच्या शिफारसीनुसार खरेदी करण्यात येणार आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता साहित्य वाटप करण्याच्या आदेशास खरेदी समिती आणि आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. न्यायालयाने 1 ऑक्टोबर 2020 रोजी नव्याने निविदा कार्यवाही न करण्याबाबत आदेश दिले आहेत.

त्यानुसार बालवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता शालेय प्रयोगवही, चित्रकला वही, भूगोल नकाशावही आणि विविध अभ्यासपूरक पुस्तके खरेदी करण्यास येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

लेखाशिर्ष सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता व विकासवरील उपलब्ध तरतूद दोन कोटी आणि लेखाशिर्ष व्यवसायमाला व स्वाध्यायमाला उपलब्ध तरतूद एक कोटी यामधून येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.