Pimpri news: महापालिकेच्या विद्युत व गॅस शवदाहिन्या नादुरुस्त; दुरुस्ती कामासाठी ‘या’ कालावधीत राहणार बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत व गॅस शवदाहिनीमध्ये दोन महिन्यांपासून शव दहन होत आहेत. त्यामुळे काजळी निर्माण होऊन शवदाहिन्या नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत. महापालिकेच्या सर्व दाहिन्यांमधील फरनेस अंतर्गत देखभाल दुरुस्तीचे काम टप्पाटप्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी एक शवदाहिनी दहा दिवस बंद ठेवून दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या शवदाहिनीचे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

शहरात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला 30 हून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. शवदाहिनीमध्ये सतत शव दहन होत आहे. त्यामुळे काजळी निर्माण होऊन शवदाहिन्या नादुरुस्त होण्याच्या परिस्थितीत आलेल्या आहेत. त्यामुळे सर्व दाहिनीतील फरनेस अंतर्गत देखभालीचे कामकाज करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे.

सध्या कोरोनामुळे शवांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील सहा पैकी एकावेळी एकच शवदाहिनी 10 दिवसांकरिता बंद ठेवून अंतर्गत देखभालीचे कामकाज करण्यात येणार आहे.

दाहिनीचे तापमान खूप अधिक असल्याने ते काम करण्याइतपत थंड होण्याकरिता तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. तसेच कामकाज केल्यानंतर दाहिनीचे शव दहनाइतपत तापमान वाढविण्याकरिता दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून शहरातील एकूण सहा दाहिनीतील फरनेस अंतर्गत देखभाल दुरुस्तीचे कामकाज करण्यात येणार आहे.

देखभाल दुरुस्तीसाठी या कालावधीत बंद राहणार विद्युत दाहिन्या

#चिंचवड लिंक रोड येथील दाहिनी फरनेस क्रमांक दोनचे कामकाज 21 ते 30 एप्रिल या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे या दरम्यान दाहिनी बंद राहणार आहे.

#चिंचवड लिंक रोड येथील दाहिनी फरनेस क्रमांक एक 1 ते 10 मे या कालावधीत बंद राहणार

# निगडी विद्युत दाहिनी फरनेस क्रमांक एक 11 ते 20 मे कालावधीत बंद राहणार

# निगडी विद्युत दाहिनी फरनेस क्रमांक दोन 21 ते 30 मे कालावधीत बंद राहणार

# भोसरी विद्युत दाहिनी 1 ते 10 जून या कालावधीत बंद राहणार

# सांगवी गॅस दाहिनीचे काम 11 ते 20 जून दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत दाहिनी बंद राहणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.