Pimpri News : महापालिका कर्मचाऱ्यांची टंगळमंगळ; प्रशासनाची कबुली

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी हजेरी पत्रकावर (Pimpri News) स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत आहेत. विभागप्रमुखांचे नियंत्रण नसल्याने कर्मचारी वेळेत जागेवर आसनस्थ होत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याची कबुली देत  विभागप्रमुखांनी दररोज हजेरी पत्रक, फिरती रजिस्टरची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच सर्व विभागांचे हजेरी पत्रक, फिरती रजिस्टरची तपासणी केली. सकाळी दहा वाजेपर्यंत अनेक अधिकारी, कर्मचा-यांनी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केली नव्हती. फिरतीवरुन आल्यानंतर परत आल्याची वेळ, स्वाक्षरी केली नाही. रजिस्टर प्रमाणित केले नाही.

 

PCMC : महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी

 

फिरतीमधील नोंदी नोंदणी प्रमाणित करणा-या सक्षम अधिका-यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केल्याचे दिसून आले नाही. यावरुन विभागप्रमुखांकडुन कर्मचा-यांची हजेरी पत्रकावरील उपस्थिती, फिरती रजिस्टर दररोज तपासण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले.

विभागप्रमुखांचे प्रभावी नियंत्रण नसल्याने विभागातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेत आसनस्थ होत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.  कार्यालयीन कामकाज वेगात होण्यासाठी शिस्तीचे स्वयंपालन करणे, शिस्तीचे पालन करुन घेणे हे विभागपमुखांचे कर्तव्य आहे.

यासाठी त्यांना आवश्यक ते अधिकार प्राप्त आहेत. यापुढे विभागप्रमुखांनी दररोज हजेरी पत्रक, फिरती रजिस्टरची तपासणी करुन साक्षांकित (Pimpri News) करावी. कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारे, गणवेश परिधान न करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल 31 मार्च 2023 पर्यंत मागविला (Pimpri News) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.