_MPC_DIR_MPU_III

Pimpri news: महापालिका कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमधील कामाचा प्रोत्साहन भत्ताही मिळणार

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन कालावधीत काम केल्याबद्दल पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांना प्रतिदिन 150 रुपयांप्रमाणे 65 दिवसांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. हा एकूण भत्ता 9 हजार 750 इतका असेल. त्यामुळे ऐन दिवाळीत कर्मचा-यांचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV

लॉकडाऊन कालावधीत महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी जोखीम पत्करुन कोरोना उपाययोजनांबाबतचे कामकाज केले. त्यामुळे त्यांना प्रतिदिन 150 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जावा, असा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेने 13 ऑक्टोबरच्या बैठकीत मंजूर केला होता. त्यानुसार 24 मार्च ते 17 मे, 14 जुलै ते 23 जुलै या 65 दिवसांसाठी प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

या कालावधीत लोकल, पीएमपीएमएल आणि इतर प्रवासी सेवा तसेच, हॉटेल आणि भोजनालये बंद होती. महापालिका कर्मचारी आणि अधिका-यांनी जोखीम पत्करुन कामावर हजर राहून त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण केली. त्यामुळे त्यांना हा भत्ता दिला जात आहे.

हा भत्ता अतिक्रमण नियंत्रण आणि निर्मूलन, अग्निशमन, पशुवैद्यकीय, सुरक्षा, पाणीपुरवठा ,विद्युत, आरोग्य, वैद्यकीय मुख्य कार्यालय आणि सर्व रुग्णालये,यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, आपत्ती व्यवस्थापन, कोरोना कामकाजासाठी वेगवेगळया कक्षाकरिता नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी, फिल्ड सर्व्हिलन्स पथकासाठी नियुक्त केलेले महापालिका कर्मचारी, महापालिका आणि खासगी शाळेचे शिक्षक , घंटागाडी कर्मचारी, मानधन आणि ठेकेदाराकडे काम करीत असलेले कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आदींना मिळणार आहे. पात्र अधिकारी आणि कर्मचा-यांना हा भत्ता दिला जावा, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.