Pimpri News: महापालिकेची सभा ऑनलाइन होणार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा उद्या (गुरुवारी) ऑनलाइन होणार आहे.

फेब्रुवारी महिन्याची तहकूब आणि मार्च महिन्याची नियमित सभा उद्या आयोजित केली आहे. शहरातील कोरोनाच्या  रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महासभा ऑनलाइन होणार आहे. नगरसेवक, अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सभेला उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिकांच्या महासभा आणि आमसभा प्रत्यक्ष घेणे सध्या तरी शक्य नाही.

या महासभा आणि आमसभा ऑनलाइनच घेतल्या जातील अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. तसे प्रतिज्ञापत्रच राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत हायकोर्टात सादर करण्यात आले.

कोरोनाच्या संकटामुळे गेले वर्षभर महानगरपालिकांच्या महासभा घेण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. विकास प्रस्ताव आणि धोरणात्मक निर्णयही रखडले.

त्यावर तोडगा काढत सरकारने वेबिनारच्या माध्यमातून महासभा घेण्याचे आदेश राज्यातील सर्व पालिकांना दिले. त्यानुसार ऑनलाइन सभा घेतल्या जात आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.