Pimpri News : महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी घेतली विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करण्याची प्रतिज्ञा

late Prime Minister Rajiv Gandhi Punyatithi

एमपीसी न्यूज – देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवाद आणि हिंसाचाराचा सर्व शक्तिनिशी मुकाबला करण्याची प्रतिज्ञा आज (शुक्रवारी) पिंपरी चिंचवड महापालिका  पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचा-यांनी घेतली.

महापौर उषा ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महापौर ढोरे यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले आणि सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व मानव बंधूमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकविण्याची, तो वर्धिष्णु करण्याची तसेच मानवी जिवीत आणि मुल्ये धोक्यात आणणा-या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करण्याची प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली.

प्रतिज्ञापत्राचे वाचन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.