Pimpri News: पालिका स्थायी समितीची 32 कोटीच्या कामांना मंजुरी

Municipal Standing Committee approves works worth Rs. 32 crore

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे 31 कोटी 95 लाख रूपयांच्या खर्चास आज (गुरुवारी) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

त्यामध्ये रावेत येथील पंपगृहांतर्गत जलउपसा क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक पंपिंग मशीनची उभारणी करणे. त्या अनुषंगिक कामांसाठी येणाऱ्या 12 कोटी 44 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

तसेच कोरोना विषाणूमुळे (Covid-19) शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यादृष्टीने विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या मे व जून 2020 या कालावधीत हाउसकिपिंग कामाकरिता झालेल्या 49 लाख 86 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

क्रीडा विभागास आवश्यक स्काय वॉकर ओपन जिम साहित्य खरेदीकमी येणाऱ्या 95 लाख 63 हजार अशा विविध 31 कोटी 95 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.