Pimpri News : मदतकार्यासाठी महापालिकेचे पथक सांगली, मिरजला जाणार : महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरीवस्तीत पुराचे पाणी शिरुन जनजीवन पुर्णत : विस्कळीत झाले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पूरस्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . सद्यस्थितीत पुरस्थिती ओसरली असुन तेथील उपाययोजना व मदतकार्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व स्वंयसेवकांचे पथक आज सायंकाळी सांगलीकडे रवाना होणार असल्याची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर व जिल्ह्यास पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पाणी ओसरत जाईल त्याप्रमाणे महानगरपालिकेमार्फत शहराची स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना करण्यास सुरवात झालेली आहे.

या परिस्थितीवर उपाययोजना व मदतकार्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध संयंत्रे व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या पथकामध्ये 4 अधिकारी, 70 कर्मचारी तसेच 30 स्वयंसेवक यांचा समावेश आहे. हे पथक साहित्य व उपकरणासहित मदतकार्यासाठी आज संध्याकाळी सांगलीकडे रवाना होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.