Pimpri News : नामदेव ढाके यांनी आपल्या उंची इतकेच बोलावे- सतीश दरेकर

भ्रष्टाचाराची चौकशी होणार असल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू घसरली

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

अजितदादांच्या प्रयत्नांमुळे कोरोनाला रोखण्यात यश, कोविड सेंटरमधिल परिचारिकांचे वेतन देण्याची जबाबदारी महापालिकेचीच

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार व महाराष्ट्र शासन यांच्यावर आरोप करण्यापूर्वी आपल्या राजकीय उंचीचा विचार करावयास हवा होता. ढाके यांनी आपल्या उंचीइतकेच बोलावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी नगरसदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र ओबीसी सेलचे निरिक्षक सतीश दरेकर यांनी ढाके यांना लगावला आहे.

जम्बो कोविड सेंटरच्या परिचारिकांचे वेतन ठेकेदार कंपनीने दिले नसल्याने एका राजकीय पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची इज्जत चव्हाट्यावर आणली आहे.

कोरोनाच्या कालावधीत लोकांना वाचविण्याचे निर्णय घेण्यापेक्षा करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात पिंपरी चिंचवड शहराचे सत्ताधारी भाजपाचे नेते मशगुल होते.

रात्रीच्या अंधारात निविदा प्रक्रीया पार पाडणार्‍या भाजपाच्या या कारभाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहिर केल्याने शहरातील भाजपाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरु लागली आहे.

यामुळे आता ते अजितदादा पवारांवर आरोप करु लागले असल्याचे सतीश दरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाला रोखण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले होते, तर सत्ताधारी भाजपाचे लोक मलीदा लाटण्यात गुंतले होते. त्यामुळे लोकांना वाचविण्यासाठी अजितदादा पवार यांनी सातत्याने लक्ष दिले व शहरात कोरोना रोखण्यात त्यांच्या प्रयत्नांमुळे यश आले.

असे असताना भाजपा अजितदादा पवारांवर व महाराष्ट्र शासनावर भोंगळपणाचा आरोप करत असेल तर त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे असे वाटते, असा आरोप सतीश दरेकर यांनी केला आहे.

कोविड सेंटर मधिल परिचारिकांना वेतन देण्याची जबाबदारी संपूर्णपणे महापालिकेची असून त्यांनी ते दिलेच पाहिजे असेही सतीश दरेकर यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.