Pimpri News: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकर यांचाही अर्ज

एमपीसी न्यूज – चार सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकर यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे एक मत राष्ट्रवादीला मिळू शकते.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज (मंगळवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे होते. राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्थायी समितीचे सदस्य राजू बनसोडे, पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, नगरसेविका संगीता ताम्हाणे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

स्थायी समितीत राष्ट्रवादीचे केवळ चार सदस्य आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे एक सदस्य आहेत. अशी त्यांची पाच मते होवू शकतात. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपमधील नाराजी नाट्याचा फायदा होवू शकतो, या आशेवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत.

राष्ट्रवादीने माघार न घेतल्यास भाजपचे नितीन लांडगे आणि राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकर यांच्यात निवडणूक होईल. 5 मार्च रोजी अध्यक्षपदासाठी प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.